दिशा लाईव्ह न्यूज -:- लोहारा आणि परिसरात रविवार पासून चालू असलेल्या धुवांधार पावसाने सर्व पिके झोडपली आहे.
रविवारी सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसामुळे मका, कपाशीचे मोठे नुकसान झाले असून हाता - तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे .
रविवारी सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान तासभर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली . शेत शिवारात कपाशी सह मका पिकाचे नुकसान झाले आहे .
त्यानंतर ही पावसाचा जोर कमी न झाल्याने मकाच्या कणसंला नवीन कोम आले आहे. आता तर मक्याचे पीक ही हाथातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मात्र.शेतकरी संकटात असतांना एकाही लोकप्रतिनिधीना शेतकऱ्यांना भेटायला वेळ मिळाला नाही,त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणीही शेतकऱ्यांविषयी बोलायला तयार नाही.त्यांना फक्त त्यांचे राजकारण पडले आहे.
तरी शासनाने त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी
मागणी जोर धरत आहे.



Post a Comment
0 Comments