Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न! मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लावली शेवटची वीस हजार रुपयाची कुस्ती जोड!


सुनील लोहार-:- ,कुऱ्हाड प्रतिनिधी

 दिशा लाईव्ह न्यूज    ---:::----  कुऱ्हाड येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी सोमवार दिनांक 6 रोजी  कोजागिरी पौर्णिमा निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न झाली. 

या विराट कुस्त्यांच्या कार्यक्रमात    मालेगाव,हरियाणा,बारामती,मध्यप्रदेश,कन्नड, पुणे,हळदा,पारोळा धरणगाव आदी ठिकाणांहून मल्लांनी हजेरी लावली होती.  



दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील,मा.आमदार दिलीप वाघ,संजय शांताराम पाटील यांच्या हस्ते  पैलवानांची कुस्त्यांची जोड लावण्यात आल्यात.ग्रामपंचायत कमिटी कुऱ्हाड तर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

शेवटची वीस हजार रुपयाची कुस्ती जोड  मालेगाव येथील शोयब पंजाबी तर पुणे येथील विशाल बाविस्कर यांची मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कुस्ती जोड लावण्यात आली.सदर जोड आपसात सुटली होती.



कुस्त्याचा कार्यक्रम यशस्वितेसाठी  उपसरपंच कौतिक पाटील ,सदस्य अरुण बोरसे, कैलास भगत,सुधाकर महाजन,जगदीश तेली ,इम्रान कहकर, अशोक बोरसे ,रामदास देशमुख , सचिन माळी,पिंटू पहिलवान,सोनू चौधरी,पवन शेजुळ, ग्राम विकास अधिकारी  रमेश महाजन तर पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल पवार,हवालदार अरविंद मोरे,अतुल पवार ,अमोल पाटील,अरुण राजपूत,प्रमोद वाडीले,योगेश भिलखेडे आदी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



Post a Comment

0 Comments