Type Here to Get Search Results !

सोनाळे येथील शेतकरी शेती पंपाच्या केबल चोरीने हैराण


दिशा लाईव्ह न्यूज  --::-- पहूर (ता. जामनेर) – सोनाळे आणि परिसरातील शेतांमधील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सततच्या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, या चोरट्यांना पकडणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.

अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोनाळा येथील शेतांमधून तब्बल ६ शेतीपंपांच्या सुमारे ६०० ते ६५० फूट केबल लंपास करण्यात आल्याचे समजते. याशिवाय पाइपचे तुकडे करून मोठे नुकसान करण्यात आले असून, प्रत्येकी शेतकऱ्याला सुमारे ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे.


या चोरीत पुरुषोत्तम लक्ष्मण पाटील, भागवत पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, एकनाथ पाटील, दौलत पाटील, धनराज पाटील आणि हरीश पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या चोरीच्या घटना रोखण्यासाठी व चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments