Type Here to Get Search Results !

पूरग्रस्त भागांना भेट देत दिला आधार — मा. जि.प. सदस्य पुष्पाताई काळे यांचा दौरा



दत्तात्रय काटोले -:- सोयगाव.

दिशा लाईव्ह न्यूज --::-- सोयगाव : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्य व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. पुष्पाताई प्रकाश काळे यांनी आमखेडा गटातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकरी व ग्रामस्थांना धीर दिला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे दुःख समजून घेतले.

बोरमाळ तांडा, तिडका आणि घोसला या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करत पुष्पाताईंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “संकट हे कायमचं नसतं, धैर्याने त्याला सामोरं जायचं असतं. सरकार दरबारी तुमच्या मदतीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. कोणीही खचून जाऊ नये, चुकीचे पाऊल उचलू नये.”


या दौऱ्यात पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, स्केल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. ग्रामस्थांनीही यावेळी पुष्पाताई काळे यांचे आभार मानले.



या दौऱ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी, सुनील पाटील,मयूर मनगटे, भाजपा सरचिटणीस सुनील गावंडे, तालुका अध्यक्ष संजय पाटील, विशाल गिरी, संजीवन सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सभापती नंदाताई आगे, भाजपा जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील, संचालक रवींद्र पाटील, समाधान, नाना हिवरे, बावस्कर, किशोर पाटील, दशरथ झलवार, सदाशिव चव्हाण, राजेश चव्हाण, भगवान पवार आदींचा समावेश होता.


ग्रामस्थांची गर्दी लक्षणीय होती. शेवटी, पुष्पाताईंनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढील काळात अधिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.





Post a Comment

0 Comments