दिशा लाईव्ह न्यूज ----:::--- जीनियस मास्टर्स फाउंडेशन जामनेर तर्फे जिल्हास्तरीय आदर्श किर्ती पुरस्कार २०२५ चे वितरण दिनांक ०५/१०/२०२५ रोजी स्वामी विवेकानंद हॉल मधुबन कॉलनी जळगाव रोड जामनेर येथे करण्यात आले,
यात एकूण 42 शिक्षकांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आले, त्यापैकी लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास (लोहारा बॉईज) येथिल जिल्हा परिषद शाळेतील आदर्श व प्रतिभावंत शिक्षिका सौ. प्राजक्ता जळतकर मॅडम यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन आदर्श कीर्ती पुरस्कार सन्मानित करण्यात आले,
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मा.श्री चंद्रकांत बाविस्कर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुहास पाटील, अमर पाटील, दीपक तायडे, डॉक्टर प्रशांत बोंडे, डॉक्टर नंदलाल पाटील,श्री विजयजी सरोदे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, श्री विश्वास पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी पारोळा, ग.स. सोसायटीचे सर्व संचालक, प्राथमिक शिक्षक पतपेढी भुसावळचे संचालक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती होती.


Post a Comment
0 Comments