Type Here to Get Search Results !

इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी सराव महत्त्वाचा – एपीआय प्रमोद कठोरे महावीर पब्लिक स्कूलच्या वर्धापन दिनी गुणवंतांचा गौरव 'शिक्षा सारथी सन्मान ' पुरस्काराचे वितरण


 दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर (ता. जामनेर) –

“इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण सराव अत्यंत गरजेचा आहे. महावीर पब्लिक स्कूलचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी काढले.

नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक स्कूलच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात वर्धमान महावीर, स्वर्गीय कृषी पंडित मोहनलाल लोढा आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.



या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप लोढा, उपाध्यक्ष तेजराज जैन, सचिव दीपक लोढा, संचालक श्याम सावळे, कृषी पंडित पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव पांढरे, राजमल भागवत, सरपंच अबू तडवी, तसेच कैलास पाटील, रामेश्वर पाटील, निलेश भगत, राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, प्रल्हाद वानखेडे, राजू पाटील, योगेश बनकर, ईश्वर बारी, लक्ष्मण गोरे, अशोक घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, शरद बेलपत्रे, ईश्वर हिवाळे यांनीही उपस्थिती लावली.

जैन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल छाजेड, उपाध्यक्ष पवन रुणवाल, डॉ. अरविंद चोरडिया यांच्या हस्ते  , दिपाली नेमाडे , विलास जोशी , शंकर भामेरे , ईश्वर चोरडीया ,  रामचंद्र चव्हाण, आसिफ पिंजारी, दिपाली पाटील, कविता लाड, वर्षा वैदकर, अनिता क्षीरसागर, आम्रपाली निकम, वैशाली घाटे, हर्षदा बेलपत्रे, छाया महाजन, अपेक्षा पन्यार, हिना तडवी, सिमरन सरपटे, शाईना पठाण, भाग्यश्री जाधव, हर्षाली बडगुजर, श्रीमती तायडे, सोनल पाटील, किरण भट यांना 'शिक्षा सारथी सन्मान ' प्रदान करण्यात आला .


संस्थेतर्फे एमटीएस, स्कॉलरशिप, मॅथ ऑलिम्पियाड आदी परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्याध्यापिका दिपाली नेमाडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.   सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments