Type Here to Get Search Results !

पहूर येथे आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन.



 दिशा लाईव्ह न्यूज--::-- पहूर येथे आज भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       पहूर शहर पत्रकार संघटना व हार्ट प्लस हॉस्पिटल जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आणि पहूर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व पहूर केमिस्ट असोसिएशन यांच्या अनमोल सहकार्याने आज डॉ रविंद्र बडगुजर यांचे आई मल्टीस्पेशालिटी डे केअर सेंटर   पहूर येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

  आज आयोजित मोफत शिबिरात जळगाव येथिल सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप अशोक भारुडे एम.बी.बी.एस., एम.डी., डी.एन.बी. इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट  हे स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत. 

सदर शिबिरात  बी.पी ,पल्स रेट चेकअप, लिपिड प्रोफाईल,शुगर,ई.सी.जी ,2 डी इकोग्राफी पूर्णपणे मोफत तसेच गरजू रुग्णांना अँजिओग्राफी माफक दरात व आवश्यकतेनुसार अँजिओप्लास्टी  मोफत होणार आहे.  तरी जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन पहूर शहर पत्रकार संघटना , पहूर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, पहूर मेडिकल असोसिएशन यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments