Type Here to Get Search Results !

मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा!! प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांच वृद्धपकाळात निधन.


दिशा लाईव्ह न्यूज -:-  आज ४ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने आज सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संध्याजींचं आयुष्य नेमकं कसं होतं हे त्यांची सावत्र मुलगी मधुरा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

 याबद्दल त्या लिहितात की,...."संध्या यांनी माझ्या वडिलांच्या चित्रपटात काम केलं. त्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या, त्यामुळे त्यांच्यावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप  त्यांच्यावर होत असे. लग्नानंतर माझे वडीलही त्यांच्याश स्टुडिओमध्येच राहायला गेले. संध्या अगदी साध्या राहायच्या सफेद साडी, हिरव्या बांगड्या, टिकली आणि मंगळसूत्र. जयश्री यांना तिसरं अपत्य झाल्यानंतर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे संध्या यांना मुलं झाली नाहीत. पण त्या नेहमी म्हणायच्या, तुम्ही सगळे माझीच मुलं आहात. माझे बाबा दररोज स्टुडिओची फेरी मारायला जायचे. एकेदिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्यांचं मणक्याचं एक हाड तुटलं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. ते खूप अशक्त झाले.

त्यांनी खाणंपिणं सोडलं. बेशुद्धीच्या अवस्थेतदेखील ते सगळ्यांना ऑर्डर द्यायचे. लाइट लावा...त्याकाळात संध्या यांनी त्यांची खूप काळजी घेतली. एकदा त्यांना उलटी झाली तेव्हा संध्या यांनी ती स्वतःच्या हातात घेतली. त्यांच्यासारखी बाईच हे करू शकत होती. आम्ही त्यांची मुलं असूनही असं करू शकलो नसतो. 

शेवटी १९९० मध्ये वडिलांचं निधन झालं. त्यांच्या अंत्य संस्काराला त्यांच्या तिन्ही पत्नी हजर होत्या.मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई (विमल) हिनेही अंथरूण पकडलं. १९९६ मध्ये तिचंही निधन झालं. माझ्या वडिलांनी त्यांच्या पत्नींसाठी सोय करून ठेवली होती. विमल यांचा खर्च राजकमल स्टुडिओ उचलत होता.

 तर संध्या या ८२ व्या वर्षीही टीव्ही पाहायच्या, वाचायच्या, घरी एकट्या असायच्या आणि शांत जीवन जगायच्या."

आज त्यांच्या निधनाने नक्कीच  मराठी चित्रपट सृष्टी पोरकी झाली आहे.

Post a Comment

0 Comments