दिशा लाईव्ह न्यूज --::--- लोहारा, शेंदूर्णी, आणि पहूर परिसरात थंडीची चाहूल लागली असून गार वारे वाहू लागले आहेत. दिवसभर उन्हाचा चटका असून, सकाळी आणि रात्री थंड हवामान जाणवू लागले आहे.
यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून आहे. त्यामुळे हवामानात गारवा वाढलेला असून, पुढील काळात थंडीचा जोरही वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा विचार करून पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीस अशा प्रकारे वातावरण थंड होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी यंदा पावसाचा मोठा परिणाम थंडीवरही जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments