Type Here to Get Search Results !

अमेरिका स्थित युनिव्हर्सिटी ऑफ लुयिसीआनाच्या माध्यमातून लोहारा येथील अर्जुन भोई नवीदिल्ली येथे डॉक्टरेटने सन्मानित....



 दिशा लाईव्ह न्यूज। ---:::----सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात कार्यरत असलेले लोहारा येथील अर्जुनभोई सद्यस्थितीत मुंबई विभागात कार्यरत असलेले विविध सन्मानाने सन्मानित आहेत.

 काल दिनांक १२/१०/२०२५ रोजी त्यांना नवी दिल्ली येथील फाईव्ह स्टार होटल राडीसन ब्लू मापले गोल्डमध्ये डाँक्टरेट देऊन सन्मानपुर्वक सन्मानित केले गेले. आतापर्यंत ते विविध सन्मानाने सन्मानित आहेत. 

खान्देशभूषण सन्मानाने ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित, ज्येष्ठ समाजसेवक, जेष्ठ पत्रकार, माजी सहसंपादक म्हणून ही ते परिचित, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर गुणवंत, आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित, राष्ट्रीयस्तरावर आदर्श विद्यासन्मानाने ते सन्मानित, राष्ट्रीयस्तरावर चाणक्य नॅशनल लीडरशिप अवार्डने ते सन्मानित, राष्ट्रीयस्तरावर गौरव पुरस्काराने ते सन्मानित, राज्यात बाराबलुतेदार भूषण, भोईसमाज भूषण, राष्ट्रीयस्तरावर सुभाषचंद्र बोस आयकॉन अवार्ड विजेते, राष्ट्रीयस्तरावर सेवापुरस्काराचेही ते विजेते, राष्ट्रीयस्तरावर डॉ एपीजे अब्दुल कलाम भारतीय रत्न सन्मानाने ते सन्मानित, 

मध्यप्रदेशात समाजसाथी सन्मानाने ते सन्मानित, राष्ट्रीयपातळीवर भारतीयरत्न सन्मानाने ते सन्मानित, राष्ट्रीयस्तरावर महात्मा गांधी नॅशनल प्राईड अवार्डनेही ते सन्मानित, पुणे मल्लाव समाज सन्मानाने ते सन्मानित, डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक राज्यस्तरीय अवार्डचे ते विजेते, राष्ट्रीयस्तरावर राष्ट्रीयसन्मान नॅशनल आयडियल टीचर अवार्ड २०२५चे ते विजेते आणि आता नवी दिल्ली याठिकाणी भारतीय अवार्डस् काऊंन्सीलच्या माध्यमातून अमेरिकाच्या युनिव्हर्सिटी आँफ लुयिसीआची डॉक्टरेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे....

अर्जुन भोई यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल लोहारा आणि परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments