ईश्वर हिवाळे-पहूर
दिशा लाईव्ह न्यूज --::--पहूर,ता.जामनेर(वार्ताहर) पहूर येथे आज दिवाळी सणासुदीच्या दिवसात अतिक्रमणधारकांचा रोजगार हिरावला, हातोडा अतिक्रमणावर की रोजगारावर असा नागरिकांचा संतप्त सवाल? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत आज पहूर येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या होत्या.
मात्र सणासुदीचे दसरा दिवाळीचे दिवस असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम दिवाळीनंतर राबवावी अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली होती.
मात्र या मागणीचा कोणताही विचार प्रशासनाने केला नाही व आज दुपारी बारा वाजेपासून पोलीस बंदोबस्त घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर अतिक्रमणावर बुलडोझर फिरवला असल्याने असंख्य अतिक्रमण धारकांचे कुटुंब बेरोजगारीच्या खाईत लोटल्या गेले आहेत .
अतिक्रमण काढत असताना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकारणावर होणार मोठा परिणाम
आज पहूर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली खरी ,मात्र अतिक्रमण धारकांचे अवघ्या पाच दिवसावर आलेल्या दिवाळीमुळे त्यांची दिवाळीच यंदा अंधारात होणार असल्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहे .
अतिक्रमण काढत असताना मात्र जामनेर तालुक्याचे राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असलेले व जिल्ह्यात नावारूपास आलेले अनेक लोकप्रतिनिधी मात्र या अतिक्रमणधारकांच्या पाठीशी तर सोडाच पण अतिक्रमण काढत असताना साधे समोरही न आल्याने अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
एवढेच नव्हे तर आगामी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या निवडणुकांमध्ये याचा प्रचंड परिणाम या राजकीय लोकप्रतिनिधींना भोगावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज अतिक्रमण धारक ते रस्त्यावर आले असून त्यांचा संसार आता कसा चालणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया-:- हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात पवित्र सण म्हणून दिवाळीच्या सण प्रसिद्ध आहे .दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना आज अचानक अतिक्रमणाचा हातोडा पडल्याने अनेक कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे .
संदीप बेढे, टपरीधारक



Post a Comment
0 Comments