पहूर प्रतिनिधी--::-- ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहुर येथे अतिक्रमण हटाव मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली . दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले असून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे तर दिवाळी पूर्वीच दिवाळं निघाले आहे .
जामनेर तालुक्यातील पहुर येथे जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस मध्यरेषेपासून 15 मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्यात येत आहे . यापूर्वी ही मर्यादा साडेबारा मीटर होती . मात्र राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने ही मर्यादा साडेबारा वरून पंधरा मीटर झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे .
असे जरी असले तरी ऐन सणासुदीचा काळ असल्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम तुर्तास थांबवून दिवाळीनंतर राबविण्यात यावी अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे .
बेरोजगारीचा प्रश्न गंभीर
पहूर बस स्थानक परिसरात १०० हून अधिक बेरोजगार तरुण उदरनिर्वाह करतात . अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे या अतिक्रमण धारक व्यवसायिकांच्या पोटावरच कुऱ्हाड आल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे .
एकीकडे सरकारतर्फे बेरोजगारीवर काम केले जात असताना दुसरीकडे मात्र असलेला रोजगार हिरविण्याचा प्रकार घडताना दिसत आहे .
अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी मात्र तटस्थतीच्या भूमिकेत असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार असल्याचे बोलले जात आहे .
अतिक्रमण हटाव ची मोहीम शासन आणि प्रशासनाने सणासुदीच्या काळात राबवून एक प्रकारे हिटलरशाहीच केल्याचा प्रकार आहे . याचे परिणाम बेरोजगार तरुणांवर होणार आहे .
सुरेश घोंगडे -
सामाजिक कार्यकर्ते


.jpg)
Post a Comment
0 Comments