दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील जेष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत आणि शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष, आपल्या थेट भाषणाने व बेधडक भूमिकेमुळे ओळखले जाणारे ‘मुलुख मैदान तोफ’ अरुण भाऊ पाटील (उबाठा) यांनी आज शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला.
मुंबई येथील शिवसेना भवनात झालेल्या या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश झाला. या वेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आणि कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपक राजपूत हे आपल्या कार्यकाळात विकासाभिमुख दृष्टिकोन व प्रामाणिक स्वभावामुळे जनतेत लोकप्रिय आहेत. त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. तर अरुण भाऊ पाटील यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनासाठी नेहमीच लढा दिला आहे.
दीपक भाऊ राजपूत आणि अरुण भाऊ पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने शिंदें गटाला नक्कीच बळकटी मिळाली आहे.

Post a Comment
0 Comments