प्रतिनिधी --::-- सुनील लोहार
दिशा लाईव्ह न्यूज --::- पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, देशाची एकता आणि अखंडता वाढवणे, एक भारत, महान भारत या भावनेला सामर्थ्य देणे तसेच देशामधील ऐकी, बांधिलकी व श्रद्धा यांचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन तर्फे १दि.31/10/2025 रोजी सकाळी ठीक 07.00 वाजता ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील मैदानावर एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी गावातील सर्व नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, सर्व पोलीस पाटील,सर्व तरुण वर्ग तसेच महिला व मुलीना आव्हान करण्यात येत आहे की, सर्वांनी आपल्या भारत देशाची एकता, एकात्मता आणि सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्यासाठी एक पाऊल पुढे करून रन फॉर युनिटी करिता आयोजित केलेल्या एकता दौड मध्ये सहभागी होऊन 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला अधिक दृढ करण्यासाठी हातभार लावूया.


Post a Comment
0 Comments