सुनील लोहार-:- कुऱ्हाड प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज --::-- आज पाचोरा पंचक्रोशीतील शेतकर्यांनी ठरल्याप्रमाणे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत सर्व महापुरुषांना माल्यार्पण करत जोरदार शेतकरी समर्थनार्थ घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला.
त्यानंतर मा.प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर येवून शेतकरी हितार्थ घोषणाबाजी केली व तेथेच मा.विनोद कुमावत(नायब तहसिलदार), मा. राहुलकुमार पवार(पोलीस निरीक्षक), पाचोरा व प्रांताधिकारी यांचे निवेदन देवून शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.
पुढे सर्व उपस्थित शेतकरी बांधवांनी मा.पोलीस निरीक्षक यांच्याकडे शासनाचे शेतकऱ्यांच्या जळजळीत वास्तव प्रश्नांकडे वेळीच लक्ष वेधण्यासाठी स्वतःला अटक करून घेतली. मा.पोलीस निरीक्षक व स्टाँपने सर्वांची नोंद घेवून शेतकर्यांची थोड्या वेळाने सुटका केली.अशा प्रकारे खालील प्रमुख मागण्यांसाठी शेतकर्यांनी आजचे जेलभरो आंदोलन केले:-
१) शेतकर्यांचा सातबारा कोरा.
२) वाढलेल्या महागाईनुसार शेतकर्यांचा शेतमाल हमीभाव वाढवावा व त्याची वेळीच १००% काटेकोरपणे अंमलबजावणी वेतन आयोग प्रमाणे नैसर्गिक तत्वावर करावी आणि त्यात काही अडचणी आल्यास तत्काळ समांतर भावांतर योजना २४/७ सुरू करुन शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर १५ दिवसांत फरक द्यावा.
३) भारतीय न्यायालयांनी शेतकरी भारतीयच आहेत(चीन, पाकिस्तानी नाहीत) हे सदैव लक्षात ठेवून वेळीच नैसर्गिक तत्वावर न्यायनिवाडा करावा; यापुढे वेळकाढूपणा मुळीच करु नये.
आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य क्रुषी उत्पादक संघटनेचे पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा तालुक्यातील खालील शेतकरी बांधव उपस्थित होते.निळकंठ प्रल्हाद पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे आकाश एकनाथ चित्ते,किरण आबा पाटील,ईश्वर चिंधा पाटील,रविंद्र सुरजमल भावसार,नाना हिरे,जनक पाटील, समाधान पाटील,अमोल पांढरे,अनिल पाटील,जितेंद्र पाटील,गिरीष सुदाम पाटील,गणेश पाटील,भागवत सखाराम पाटील,बन्सीलाल पाटील,कृष्णा वानखेडे,नाना पाटील,मनोज भगवान पाटील,
रोहिदास पाटील,राजेंद्र फकिरा पाटील,मांगिलाल बारकू पाटील, काशिनाथ राजाराम पाटील, विठ्ठल आप्पा गुंजाळ, किशोर आप्पा गरुड इत्यादी शेतकरी बांधव हजर होते.





Post a Comment
0 Comments