पहूर प्रतिनिधी-:- ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जुळ्या बाळांना जन्म देऊन आई निजधामाला गेल्याची दुर्दैवी घटना ( ता . १७ ) सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली .
जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील रहिवाशी सौ . माधुरी अक्षय जाधव यांना प्रसूतीसाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . आज सोमवारी सकाळी ७ - ३० वाजेच्या त्या प्रसूत होऊन त्यांनी दोन गोंडस बाळांना ( मुले ) जन्म दिला . मात्र दुर्दैवाने त्यांचे उपचारादरम्यान दुपारी १ - ३० वाजता त्यांचे निधन झाले . रक्तदाब कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले .
जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले .गेल्या दोन वर्षातील पहूर गावातील ही चौथी घटना आहे .
सायंकाळी आठ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर वैकुंठ धाम स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले .
धुळे येथे राज्य राखीव दलात कार्यरत असलेले अक्षय रमेश जाधव यांच्या त्या पत्नी होत .
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या . त्यांचा हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभाव होता . त्या शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचित होत्या . विवाह नंतर देखील त्यांचे उच्च शिक्षण सुरू होते . त्यांच्या निधनामुळे पहूर गावावर शोककळा पसरली आहे .

Post a Comment
0 Comments