कुऱ्हाड प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज -:- कुऱ्हाड तालुका पाचोरा_कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कविता प्रदीप महाजन यांना तीन चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीने केलेल्या अतिक्रमनच्या मुद्द्यावरून अपात्र करण्यात आले होते.यासंदर्भात कुऱ्हाड येथील जमील काहाकर यांनी त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमण संदर्भात तक्रार केली होती.
येथून अपात्र होत, सरपंचांनी नाशिक विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले असता त्या ठिकाणी तात्पुरती स्थगिती येऊन पुन्हा येथील निकालाने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. सरपंच पती प्रदीप महाजन यांनी संभाजीनगर येथील खंडपीठात याचीका दाखल करीत येथील न्यायालयाने काल सोमवारी सरपंच पदावर पुन्हा घेण्याबाबत आदेश दिला.
तीन ते चार महिन्यापूर्वी विरोधी गटाचे उपसरपंच कौतिक पाटील हे ग्रामपंचायतचे कारभार पाहत होते. अखेर नाट्यमय खेळीने त्या सरपंच पदावर पुन्हा विराजमान झाल्यात.
(आम्ही केवळ खाजगी जागेवर घराचे बांधकाम केलेले असताना विरोधकांनी मुद्दामहून अतिक्रमण संदर्भात तक्रारी केल्या होत्या.त्यांनी आजपर्यंत खोटे निकाल लावत,आम्ही अखेर न्यायदेवतेकडे न्याय मागून सत्याचा विजय झाला.
कविता महाजन विद्यमान सरपंच .कुऱ्हाड खुर्द

Post a Comment
0 Comments