Type Here to Get Search Results !

चिमुकल्या ‘यज्ञा’ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीचीच शिक्षा व्हावी! पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह संतप्त ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन




पहूर  प्रतिनिधी-(ता. जामनेर)

 दिशा लाईव्ह न्यूज--::--मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम विजय संजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या एकमुखी मागणीसाठी आज, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी संतप्त आवाज उठवला. मूक मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यज्ञाच्या आत्म्यास न्याय मिळवण्यासाठी ठाम भूमिका घेतली.


छत्रपती शिवाजी महाराज चौक–दादासाहेब कॅप्टन एम.आर. लेले  पहूर बसस्थानक येथून मोर्चाची सुरुवात झाली.

आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर.बी.आर. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी हातात निषेध फलक घेऊन निर्धाराने पोलिस ठाण्याकडे मार्गस्थ झाले.


पोलिस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी असलेले तीव्र निवेदन सादर केले.


या वेळी संपूर्ण पहूर संतप्त भावनेने पेटून उठले होते.

माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, उपसरपंच राजू जाधव, आर.बी.आर. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना बनकर, हरिभाऊ राऊत, शंकर भामेरे यांनी जाहीरपणे संताप व्यक्त करत म्हणाले –

“अशा राक्षसी कृत्याला समाजात जागा नाही. यज्ञाच्या हत्यारे नराधमास तात्काळ फाशी झालीच पाहिजे!”


याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पर्यवेक्षक मधुकर आगारे, माजी सरपंच शंकर जाधव, सदस्य विक्रम घोंगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र लाठे, शिक्षिका विद्यादेवी भालेराव, सुनिता पाटील, माधुरी बारी, सरोजिनी वानखेडे, डी. वाय. गोरे, बी. एन. जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पहूरकर संतापून उपस्थित होते.


गावातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

यज्ञासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments