दिशा लाईव्ह न्यूज-:-- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव झटणाऱ्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी जळगांव येथील बेंडाळे महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सुधाकर तुळशीराम ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश जाधव सर व माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष श्री घनःश्याम निळे सर, व मार्गदर्शक प्रविण बाविस्कर सर यांच्या शिफारशी वरून संघटनेच्या राज्याध्यक्ष श्रीमती शुभांगी ताई पाटील यांनी काल प्रा सुधाकर ठाकूर यांना कनिष्ठ महाविद्यालय जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले. या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार ॲड विवेक सूर्यवंशी तसेच प्रविण बाविस्कर सर, भागवत सोनवणे सर महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन चे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश साळुंके सर उपस्थित होते.
प्रा सुधाकर ठाकुर हे मागील सुमारे वीस वर्षापासून जळगांव येथील सुप्रसिद्ध बेंडाळे महाविद्यालय येथे अध्यापनाचे काम करत आहेत. व त्या सोबतच त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध पदे भूषविली आहेत. प्रा ठाकूर हे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी परमानंद ठाकुर यांचे बंधू असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची व समस्यांची जाण असलेल्या व त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कुटुंबातील सदस्य असल्याने त्याच्या जिल्हाध्यक्ष पदी निवडी मुळे त्यांच्या कार्याला न्याय मिळणार आहे. त्यांच्या या निवडी बद्द्ल बेंडाळे महाविद्यालयाचे अध्यक्ष व संचालक तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी तसेच जळगांव जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

.jpg)
Post a Comment
0 Comments