दिशा लाईव्ह न्यूज --::-- कराड येथील शासकीय विश्राम गृहाच्या भव्य सभागृहात महाराष्ट्र राज्यातील अग्रेसर असणाऱ्या द युवा ग्रामीण पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या समन्वयाने बैठकीचे अतिशय नियोजन बद्ध आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक राष्ट्र अध्यक्ष आदरणीय अन्सार शेख साहेब तसेच संघटनेच्या महिला राज्याध्यक्षा रूपाली ताई सावंत ,सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद दिवाणजी सर , सातारा जिल्हा महिला अध्यक्ष नीलम पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश यादव ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रेम मोरे, पाटण तालुकाध्यक्ष पांडुरंग लोहार ,कराड तालुका अध्यक्ष संतोष थोरात, तसेच सातारा जिल्ह्यातील राजेश पवार ,लालासाहेब माने पाटील यांच्या समवेत जिल्हा कमिटी मंडळ तसेच सर्व तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व पत्रकार बंधू व भगिनी अनेकांच्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच स्वस्था अध्यक्ष आदरणीय अन्सर शेख सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की "पत्रकारिते सोबत समाजकार्य करणे ही अतिशय गरजेचे आहे. पत्रकारांनी अन्यायविरुद्ध उभे राहिले पाहिजे, तसेच संघटनेच्या वाढीसाठी सहकार्य केले पाहिजे .आपली संघटना वाढवण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे .".
तसेच महिला अध्यक्ष रूपालीताई सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की "महिलांनीही संघटनेत सहभागी होऊन पत्रकारितेबरोबर समाजकार्य करण्याची गरज आहे .महिलांनी संघटनेत सहभागी होण्याची गरज आहे ."
या बैठकीमध्ये चि. आरव विक्रम महिपाल. या बालकाचा कला शासकीय योगासन स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यात विभागीय निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष व सरकार टाईम चे संपादक दिवाणजी सर तसेच सरकार डिजिटल चे संपादक पांडुरंग कुंभार यांचाही सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन पांडुरंग लोहार यांनी केले तर आभार प्रेम मोरे यांनी मानले.
संपादक-:- दिनेश सोनजी चौधरी.
जळगांव जिल्हाध्यक्ष-द युवा ग्रामीण पत्रकार संघटना.
9309918930





Post a Comment
0 Comments