Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथे आजपासून यात्रोत्सव. हजारो भाविक भक्तांनी घेतले रथोत्सवाचे दर्शन.

 


दिशा लाईव्ह न्यूज-:- ( देवेंद्र पारळकर )    खान्देशचे  प्रति पंढरपुर नगरी असलेल्या क्षेत्र शेंदुर्णी येथील  पावन भूमीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुख्मिणी रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा वर्ष २८२.संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा रथोत्सव ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



आज आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.नवसाला पावणारा हा रथोत्सव असुन केळी वाहण्याची प्रथा परंपरा आहे.अग्रभागी अश्वारूढ दोन युवती, शेंदुर्णी व पंचक्रोशीतील भजनी मंडळी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ महिला भजनी मंडळ, पालखी,शहाबाद्यांच्या गाड्यांवर सजीव दृश्ये, वेगवेगळे सोंगं, अतिशय अरुंद रस्ता मात्र याच रस्त्यावर हा रथ मोठ्या डौलात मोगरीवाले यांच्या कुशल नियोजन यामुळे रथमार्गावर जागोजागी भाविकांकडुन दर्शन  आज घेतले गेले.



यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाने केलेल्या नुकसान यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे यामुळे थोडी गर्दी कमी जाणवली.सोन नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर यात्रा भरली आहे.पावसाने सुद्धा काही क्षण आपली हजेरी लावली होती.शेंदुर्णीची परंपरा या उत्सवाला पुन्हा एकदा प्रत्ययास आली.सर्व राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भगवान श्री त्रिविक्रम महाराज की जय 

संतश्रेष्ठ कडोजी महाराज की जय.

Post a Comment

0 Comments