Type Here to Get Search Results !

लोहारा येथील शेतकरी तथा पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्यावर रिवाल्वर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी पिंपळगाव हरे येथे गुन्हा दाखल.




  दिशा लाईव्ह न्यूज --:--लोहारा तालुका पाचोरा  येथील चंद्रकांत पाटील व्यवसाय प्लॉटिंग,यांना रात्री  आठच्या दरम्यान

8411982297 या नंबर वरून कॉल आला व यांना सांगितले तुमची प्लॉटिंगची साईट दाखवा, सदर चंद्रकांत पाटील बोलले मी उद्या दाखवतो, तरी त्यांनी सांगितले आम्हाला रोडवरून तरी दाखवा, तरी चंद्रकांत पाटील त्यांना साईट दाखवणे साठी 7:45 दरम्यान गेले असता, वरील आलेल्या नंबरावरून रिवाल्वर दाखवून.

नामक महिला********** हिला तिचा नवरा ******  **** याच्या पासून फारकत घ्यायला सांग... अन्यथा तुझा गेम करून टाकू... असा वरील नंबर वरुन आलेला इसम बोलला कि आमच्या कडे त्या महिलेचे पुरावे आहे.

 या  कारणा वरुन चंद्रकांत पाटील यांना ब्लॅकमेल करून  दोन हजार रुपये फोन पे वरुन 8411982297 या नंबर वर टाकण्यास सांगितले. फिर्यादी चंद्रकांत पाटील यांनी टाकले...

तशी तक्रार चंद्रकांत पाटील यांनी 100 नंबरला कॉल करून सांगितले. व त्या संदर्भात दिनांक 1/11/2025 रोजी 

 पिंपळगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 308( 2 ), 351 (2),351 (3), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास  पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या कर्तवदक्ष पोलीस उपनिरीक्षक   (api) सौ.कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  लोहारा औट पोस्टचे पोलीस हवालदार अरविंद मोरे हे करीत आहे.

  नेमकी घटना  कोणत्या करणारमुळे घटना? खरे कारण काय? खरोखरच पिस्तुल दाखवले का? का अजून दुसरेच काही कारण आहे?असे अनेक प्रश्न ग्रामस्थांच्या चर्चेतून दिसत आहे.

असे असले तरी या प्रकरणात तक्रारदार हे एक शेतकरी तसेच प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणारे व्यवसायीक असून संबंधित संशयित आरोपींनी चंद्रकांत तायडे यांना प्लॉट घ्यायचा आहे असे सांगून बोलावून घेतले .

मात्र नंतर एका महिलेला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे सांगा अशी मागणी करण्यात आली असल्याचे फिर्यादीनेच दिलेल्या फिर्यादीत नमूद केले असल्याने या प्रकरणाबाबत खरा प्रकार काय आहे हे न उलगडणारे कोडे असून याबाबत लोहारा गाव, परिसरात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. म्हणून पोलीसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन सत्य समोर आणले पाहिजे अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त केली जात आहे. 

खरोखरच चंद्रकांत पाटील यांना पिस्तुल लावले का? तेही फक्त 2 हजार रुपयांसाठी?

पैसे मागणारे खरोखरच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे का! या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात नक्कीच कळेल.



सुविचार---गद्दार मित्रांपासून सावधान. तेच माणसाला संकटात टाकतात.



Post a Comment

0 Comments