Type Here to Get Search Results !

लोहारा येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन.


दिशा लाईव्ह न्यूज। --::--  "भारतात स्वच्छता अभियानाचे जनक", अज्ञान, अंधश्रध्दा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमाने जागरूक करून समाज सुधारणा करणारे.

     स्वत:च्या हाती झाडू घेवून जनमनात स्वच्छतेचा मंञ घुमविणारे व-हाडच्या मातीतील थोर समाजसुधारक व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी सर्वसामान्य माणसाचे ऐहिक जीवन सुखी कसे होईल, तो अंधश्रध्देपासून मुक्त, सुशिक्षित व संपन्न कसा होईल याचेच सदैव प्रबोधन केले.

थोर समाजसुधारक, कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या "पुण्यतिथी दिना" निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि पविञ पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.



यावेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मनोरुग्णांसाठी काम करणारे माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. 

खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ असून  त्यांनी कोणत्याही औडंबर न करता एक गाडगे एक काठी, काना कवळी व अंगावर चिंध्यापासून या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून काढून खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवला व माणसांमध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा व या पुण्यतिथी दिनानिमित्ताने आपण दीनदुबळ्यांसाठी सेवा करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असा मौलिक सल्ला समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी दिला,

सामाजिक कार्यकर्ते रमेश लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले तर अरुण लिंगायत यांनी आभार प्रदर्शन मानले.

यावेळी सर्व भाषिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश लिंगायत, अरुण लिंगायत, भिकन जाधव, नितीन लिंगायत,राजू लिंगायत, राहुल लिंगायत, शिवाजी गोसावी , राहुल कोळी, भैया देशमुख,जयसिंग भील,सुधाकर लिंगायत,आदी लोहारा  गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments