Type Here to Get Search Results !

श्री संत गजानन महाराज यांचा तोरणाळे ते शेगाव पायी दिंडी सोहळा सपन्न!! श्रद्धेचा गजर… भक्तीची पावले… आणि नामस्मरणात चाललेली वारी



दिशा लाईव्ह न्यूज --::--- तोरणाळे गावातून श्री संत गजानन महाराजांचा पायी दिंडी सोहळा भावविभोर वातावरणात संपन्न झाला.

दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी जुनी (गढी) येथील श्री गजानन महाराज मंदिरातून या पवित्र वारीचे प्रस्थान झाले.

खांद्यावर पालखी… मुखात गजाननांचे नाव…

        ॐ गजानन नमो नमः* *श्री  गजानन नमो नमः

या जयघोषात चार दिवसांची ही वारी

धामणगाव बढे, वारुळी ,वाघजाळ फाटा, शिरवा, भंडारी, घाटपुरी आणि जयपूर लांडे

या गावांमधून चालत शेगावच्या पावन भूमीवर पोहोचते.



रस्तोरस्ती भक्तिभाव, अभंग-भजनांचा गजर

आणि प्रत्येक मुक्कामी संतभोजनाची सेवा—

हीच या वारीची खरी ओळख.

गेल्या बारा वर्षांपासून — एक तप अखंड सुरू असलेली ही परंपरा

आज भाविकांच्या श्रद्धेचा जिवंत अनुभव ठरली आहे.

शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन

पुन्हा तोरणाळ्याकडे परतणारी ही वारी

भक्तांच्या मनात भक्तीचा दीप उजळवून जाते.

Post a Comment

0 Comments