Type Here to Get Search Results !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता महाजन सरपंचपदावर कायम!! पाचोरा तालुक्यातील पहिल्याच महिला सरपंच न्यायालयीन प्रक्रिया दरम्यान पोहचल्या दिल्लीला. सबंधित तक्रारदाराने सर्वोच्च न्यायालयात केलेली तक्रार खारीज



सुनील लोहार --कुऱ्हाड 

दिशा लाईव्ह न्यूज --::---कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामपंचायती च्या  विद्यमान सरपंच सौ .कविता प्रदीप महाजन यांना गावातील ग्रामपंचायत सदस्य जमील काहकर यांनी,  सरपंचांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करीत त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.तदनंतर सरपंचांनी विभागिय आयुक्त नाशिक यांच्याकडे स्थागितीसाठी धाव घेत  तेथे देखील आयुक्तांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवत,यात त्या अपात्र ठरल्यात. 



 अतिक्रमण केले नसताना सदर चुकीच्या निर्णयाविरुद्ध  कविता महाजन यांनी ॲड मंगेश पाटील यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. सदर याचिका खंडपीठाने मान्य करून  कविता महाजन यांचे सरपंचपद कायम ठेवले.  

तरीपण तक्रारदाराला न्यायालयाचा निकाल मान्य न होत

या निर्णयाविरोधात तक्रारदाराने मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

तरी प्रस्तुत प्रकरणात सुनावणी घेऊन सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा आदेश कायम ठेवत तक्रारदाराची याचिका खारीज केली. सदर प्रकरणात सरपंच कविता महाजन यांच्यातर्फे ॲड सागर पाटील आणि ॲड मंगेश पाटील यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments