Type Here to Get Search Results !

शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस केंद्रांवर मोठा गोंधळ.--शेतकऱ्यांना डोकेदुखी ...ग्रेडर व व्यापाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप!.



सुनील लोहार-- कुऱ्हाड.

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रात गोंधळ उडत पाचोरा तालुक्यातील शेतकरी रडकुंडीत आला आहे. 

अगोदरच यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत उत्पन्नात निम्मी घट आली असून  त्यात माल नाही व  खाजगी बाजारपेठेत भाव  नाही.

 नाईलाजाने शेतकऱ्यांना कापूस सीसीआय वर विक्री साठी आणावा लागत आहे.  शासनाने हमीभावाच्या नावाखाली सुरू करण्यात आली कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देखील अनेक शेतकऱ्यांना जिनिंग मध्ये प्रवेश नाकारला जात आहे. तसेच कापसाची भरून ठेवलेली वाहने तीन ते चार दिवस  केंद्राबाहेर ताटकळत ठेवावी लागत आहे. 



तसेच कापूस खरेदी करताना प्रतवारी बघून मोठ्या प्रमाणावर कट्टी लावली जात असल्याने शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. एरव्ही व्यापाऱ्यांचे वाहन आल्यास ते तात्काळ मोजून खाली होत असल्याने  शेतकऱ्यांना दुजाभावाची वागणूक देत आहे.


 यात ग्रेडर व व्यापाऱ्यांचे काही साठे लोटे असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी  केला आहे. व्यापाऱ्यांच्या मालाला चांगली प्रतवारी देऊन शेतकऱ्यांचा माल खराब असल्या कारणाने वाहन परत पाठवले जात आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.




 मी एक ट्रॅक्टर कापूस वडगाव अबे येथील सीसीआय केंद्रात विक्रीसाठी आणला असता मालाची प्रतवारी खराब असल्याचे सांगत माझा कापूस मोजला नाही.

दिनेश पाटील --:-शेतकरी वाडी शेवाळे.

माझा दोन ट्रॅक्टर कापूस वडगाव अंबे येथील जीनिंग वर आणला असता, माल खराब असल्याचे कारण दाखवीत फक्त एकच ट्रॅक्टर मधील अर्धा कापूस मोजून उर्वरित दीड ट्रॅक्टर प्रतवारी खराब असल्याचे सांगत परत पाठविले.

तुकाराम तेली -:-शेतकरी खडक देवळा.

पाचोरा व अंबे वडगाव येथील सीसीआय कापूस खरेदी प्रक्रिया ही भारत कापूस निगमच्या नियमाप्रमाणे होत असून मालाच्या प्रतवारी नुसार भावाची ग्रेड लावली जात असून शेतकऱ्यांनी  काडी कचरा विरहित स्वच्छ व कोरडा कापूस आणल्यास आठ हजार रुपयाचा भाव दिला जात आहे.

अनंत फुंडकर -:---ग्रेडर पाचोरा व वडगाव अंबे 

कापूस विक्रीसाठी नोंदणी केल्यानंतर  स्लॉट नोंदणीची अनुमती घरबसल्या ऑनलाइन दिली जावी ,जेणेकरून शेतकरी जिनींग भोवती चकरा मारणार नाही.

उमेश पाटील -:- शेतकरी कुऱ्हाड



Post a Comment

0 Comments