सुनील लोहार -:-कुर्हाड
दिशा लाईव्ह न्यूज --::---कुऱ्हाड खुर्द येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात येते.या ही वर्षी दिनांक 25 पासून प.पू.हरिदास बाबा मंदिरावर अखंड हरिनाम किर्तन व भागवत कथेचे निरुपम कनैया महाराज शेंदुर्णी कर हे करणार आहेत.
सप्ताहात अनुक्रमे दिलीप महाराज पवार बिडकर, माधव महाराज मुक्ताईनगर, कबीर महाराज सातारकर, दत्ता महाराज देवळेकर, संजय महाराज जामनेर, खुशाल महाराज पिंपळवाडेकर, रवींद्र महाराज तारखेडेकर,व सुनील महाराज कर्की ,मुक्ताईनगर यांचे दिनांक 1रोजी सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन होईल. तसेच दिंडी सोहळा 31 बुधवार रोजी दुपारी तीन ते सात पर्यंत राहील.
तसेच काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम माळी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
किर्तन सप्ताहाचे हे 41 वे वर्ष असून , परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन कुऱ्हाड ग्रामस्थन कडून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments