बाळू जोशी, वाकडी.ता.जामनेर.दि.१८/१२/२५
दिशा लाईव्ह न्यूज। --::-- येथे सालाबादप्रमाणे ३६ वर्षापासून चालत आलेल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार व शिरोधार्य मांडला जाणारा पवित्र ग्रंथ वाचन म्हणजेच श्रीमद भागवत कथा सप्ताह दि.१८ डिसेंबर गुरुवारपासून सुरुवात होत असून कथेचे ठिकाण परंपरेला जोपासत असलेले कैलासवासी पद्माकर केदार देहाडराय वाणी यांच्या भव्यवाड्यामध्ये होत असून कथेचे प्रवक्ते व व्यासपीठ मुकुंद मुरलीधर जोशी गोंदीकर जिल्हा जालना यांच्या रसाळ व अमृतुल्य वाणीतून कथेला सुरुवात होत आहे,
तसेच ग्रंथ पूजा प्रकाश विठ्ठल दिवटे सौ बेबाबाई प्रकाश दिवटे छत्रपती संभाजीनगर कर यांच्या हस्ते होणार आहे. कथेप्रसंगी दैनंदिन चालणारे भगवंत विनवणी धार्मिक कार्यक्रम सकाळी काकड आरती चार वाजता श्रीमद् भागवत कथा वाचन सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्याचप्रमाणे कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील बाहेर गावाहून आलेल्या भाविकांसाठी येथील अन्नदात्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये अन्नदाते गोविंदा विष्णू वाघ चेतन रामबक्ष शर्मा मिस्तरी राहुल इंदल सिंग परदेशी, ईश्वर उखडू बिडके सर, प्रकाश रामकृष्ण औटी, नंदलाल गोविंद सिंग राजपूत, त्याचप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन कार्यक्रमाचे आयोजक व नेहमी धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या गं. भा. मीनाताई पद्माकर वाणी व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शेखर पद्माकर वाणी यांचेकडून होत आहे.
कथेप्रसंगी अनमोल सहकार्य संत सुपडूगीर बाबा वारकरी संस्थेचे संचालक ह भ प रोहिदास गायकवाड महाराज गावातील भाविक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ वारकरी मंडळी तसेच भाविकांसाठी शुद्ध जलपान व्यवस्था येथील असलेले साई ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे. तसेच भाविकांनी श्रीमद् भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मीनाताई वाणी शेखर वाणी सौ ज्योती वाणी गिरीश वाणी प्राजक्ता वाणी यांनी केलेले आहे.


Post a Comment
0 Comments