दिशा लाईव्ह न्यूज-:- अगदी लहानपणापासून कीर्तनाची आवड, घरात धार्मिक वातावरण.. वडिलांचा छोटासा व्यवसाय...अगदी बेताची परिस्थिती.
मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोयगाव येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ,तरुणींसाठी मार्गदर्शक असणाऱ्या कु.जान्हवी दीदी सोनवणे (चौधरी) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आज दि.19-12-2025 वर शुक्रवारी रोजी रात्री 8.30 मिनिटांनी लोहारा येथे चौधरी वाडा येथे ठेवण्यात आला आहे.
अगदी लहानपणापासून त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनजागृती व कीर्तनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत.त्यांचा आध्यत्मितेत सखोल अभ्यास आहे.
राष्ट्रीय संत ,तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन समस्त तेली समाज बांधव यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments