दिशा लाईव्ह न्यूज -:--पहूर (ता. जामनेर) — पहूर कसबे येथील न्यू सोना फुटवेअर या चप्पल दुकानाला आज सकाळी सुमारे ७.३० वाजता (बुधवार, दि. १७/१२/२०२५) अचानक आग लागली. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर दुकानाचे मालक जुबेर शेख रफिक आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच शेंदूर्णी येथील नगर पंचायत अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


Post a Comment
0 Comments