दिशा लाईव्ह न्यूज --::--- लोहारा येथील डॉ जेजी पंडित विद्यालय व शेंदुर्णी येथील आचार्य गरूड विद्यालय हे दोन्ही विद्यालयं उत्तर महाराष्ट्रात शिक्षणासाठी नामांकित विद्यालयं समजली जातात.
या दोन्हीही विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेले आणि सद्यस्थितीत जेष्ठशिक्षक म्हणून तक्षशिला विद्यालय/महाविद्यालय मुंबई विभागात कार्यरत असलेले डॉ. श्री अर्जुनभोई यांना आंतरराष्ट्रीय नामांकन आयएसओ ९००१-२०१५प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय '"दर्पण रत्न पुरस्कार २०२६'" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. श्री अर्जुनभोई हे वृत्तपत्र सेवेत मा सह-संपादक पदापर्यंत असून चांद्यापासून ते बंद्यापर्यंत आणि कोल्हापूरपासून ते नंदुरबार पर्यंतच्या सामाजिक घटकात ते परिचित आहेत. राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार २०२६चे मानकरी ठरतांना आतापर्यंतच्या त्यांच्या सन्मानावर नजर टाकता येईल.
डॉ अर्जुनभोई यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार, नाट्य, चित्रपट तसेच राजकीय क्षेत्रातही आपली ओळख दमदारपणे निर्माण केली आहे. त्यांना भारतीय स्तरावरील नॅशनल आयडियल टीचर अवार्ड(कोल्हापूर) येथे आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार(जेजुरी), राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार(पुणे) येथे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सोबतच अमेरिकन युनिव्हर्सिटीने नवी दिल्ली येथे डाँक्टरेटही देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यासोबतच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवार्डने(पुणे)ही ते सन्मानित आहेत. स्टार ऑफ द ग्लोबी अवार्ड, महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय उत्कर्ष पुरस्कार, राष्ट्रीय अटल गौरव सन्मान, इंटरनॅशनल स्टार अवॉर्ड, पद्मश्री गौरव सन्मान, राष्ट्रीय गौरव पुरस्कार,
विश्वरत्न सन्मान, स्वामी विवेकानंद आदर्श रत्न सन्मान, विजय श्री सन्मान, सुभाषचंद्र बोस आयकॉन अवार्ड, अखंड भारत सन्मान, डॉक्टर बी.आर. आंबेडकर सोशल अवार्ड, अखंड भारत सन्मान, राष्ट्रसेवा पुरस्कार, महात्मा गांधी नॅशनल प्राईड अवॉर्ड, आदर्श विद्यारत्न सन्मान, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारतीय रत्न सन्मान, गांधी पीस इंटरनॅशनल अवॉर्ड तसेच राज्यस्तरीय बाराबलुतेदार भूषण सन्मान, मानाचा समजला जाणारा सन्मान म्हणजे खान्देश भूषण पुरस्कार, भोई समाज भूषण महाराष्ट्र अशा अनेक मान स्मानाने ते आतापर्यंत सन्मानित आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments