Type Here to Get Search Results !

नियोजन, मेहनत, निरंतर प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली!-- शांताराम चौधरीसर.



 कुऱ्हाड प्रतिनिधी ::--::सुनील लोहार 

दिशा लाईव्ह न्यूज--::--जीवनात यश मिळत नाही ते निर्माण करावे लागते जगात कोणतेही मोठे काम आपोआप होत नाही ते होण्यासाठी वेळेचे नियोजन प्रचंड मेहनत निरंतर प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन श्री गो.से .हायस्कूल पाचोरा  सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी आदर्श माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड शालेय समिती चेअरमन सतीश नारायण चौधरी होते.

 याप्रसंगी  सुधाकर माळी  यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी माहिती दिली. विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील शिक्षकांविषयी संस्थेविषयी आदरभाव व्यक्त केला. 



प्रमुख मार्गदर्शक शांताराम चौधरी पुढे म्हणाले की परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास आणि अभ्यास अभ्यास हे एकच साधन आहे .अभ्यासामुळे आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करता येते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास प्रयत्नाने वाळूचे कण ही रगडता तेल ही गळे म्हणून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये दैववादी न बनता प्रयत्नवादी बनलं पाहिजे .

परीक्षेविषयी मनामध्ये कोणतीही भीती वाढवू नका .आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. यश निश्चित मिळणारच, पास मी होणारच असे विचार मनाशी बाळगा ,मन प्रसन्न ठेवा मन करा रे प्रसन्न होईल सर्व सिद्धीचे कारण या उक्तीप्रमाणे आचार विचारांची सांगड घाला .वेळे चे नियोजन करा ,वेळ अनमोल आहे जीवनामध्ये असं कोणतंही गैर कृत्य करू नका की त्यामुळे आपल्या आई-वडिलांना शेरमेने मान खाली घालावी लागेल असं सदकृत्य करा की ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना ताट मानेने समाजात वावरता येईल .एक लहान छिद्र विशाल जहाजाला समुद्रात बुडवू शकते, त्याप्रमाणे एखादा दुर्गुण आपलं जीवन उध्वस्त करू शकतो .

म्हणून दुर्गुण पासून लांब राहा. नेहमी चांगले विचार आचार चांगलं काम करा सदैव आपलं चांगलंच होणार उच्च ध्येय ठेवा ते आत्मसात करण्यासाठी प्रचंड कष्ट करा कष्टाशिवाय फळ नाही असे त्यांनी सांगितले. 



प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश पाटील यांनी  केले. व्यासपीठावर शालेय समितीचे चेअरमन सतीश चौधरी, प्रमुख मार्गदर्शक शांताराम चौधरी, मुख्याध्यापक गणेश पाटील ,सुहास मोरे ,राजेंद्र माळी,प्रदीप पाटील,दिपक राजपूत ,मनोज कलाल,नंदिनी पाटील ,श्रद्धा पाटील,पि. आर पाटील,संदीप पाटील,रवींद बोरसे उपस्थित होते. सूत्रसंचालन आर एस माळी तर आभार पी एच पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments