Type Here to Get Search Results !

जळगावच्या डॉ. संदीप भारुडे यांनी जागतिक पातळीवर हृदयरोग उपचारात नवा इतिहास घडवला: शेंदूर्णी भूमीपुत्राची उत्तुंग भरारी.




दिशा लाईव्ह न्यूज ---::-- शेंदूर्णी येथील भूमीपुत्र व जळगावचे नामांकित डीएनबी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व एफएससीएआय (यूएसए) डॉ. संदीप भारुडे यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित CHIP CTO आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजी परिषदेत आपल्या अभिनव तंत्रज्ञानाचे सादरीकरण करून जळगावचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.


या परिषदेत डॉ. भारुडे यांनी “डबल वायर टेक्निक फॉर CTO अँड कॉम्प्लेक्स PTCA” ही नवी व अत्यंत प्रभावी पद्धत सादर केली. या सादरीकरणास भारत व परदेशातील ५०० हून अधिक नामवंत हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित होते. जगातील आघाडीच्या कार्डिओलॉजिस्टनी या तंत्रज्ञानाचे भरभरून कौतुक केले.



महत्त्वपूर्ण वैद्यकीय क्रांती

या नव्या पद्धतीमुळे —

प्रक्रियेचा कालावधी २ तासांवरून १ तासावर (५०% घट)

गुंतागुंत होण्याचे प्रमाण ८०% ने कमी

प्रक्रियेचे यशाचे प्रमाण ९५%


असे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.


ही पद्धत १००० हून अधिक गुंतागुंतीच्या PTCA रुग्णांच्या अभ्यासावर आधारित असून त्याचे संशोधन निष्कर्ष नामांकित युरोपियन मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरव


भारताचे ज्येष्ठ व सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ए. बी. मेहता (फोर्टिस व जसलोक हॉस्पिटल) यांनी डॉ. भारुडे यांचे या अभिनव संशोधनाबद्दल विशेष अभिनंदन केले.


जागतिक स्तरावर अध्यापन


डॉ. भारुडे यांची ही पद्धत आता जागतिक स्तरावर प्रमाणित (Certified) करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण व अध्यापनासाठी वापरली जात आहे.


जळगाव व शेंदुर्णी साठी अभिमानाचा क्षण


या उल्लेखनीय यशामुळे जळगावचे नाव जागतिक कार्डिओलॉजी क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. विशेष डॉ संदीप भारुडे हे शेंदुर्णी येथील रहिवाशी असून त्याच्या या यशात मोलाचे सहकार्य त्यांच्या पत्नी डॉ प्रीती भारुडे यांचे असून वडील अशोक भारुडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे म्हणून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. 


“ही नवी पद्धत हृदयरोग उपचारात सुरक्षितता, वेग व यशाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवणारी क्रांती ठरत आहे.” — CHIP CTO परिषद, दिल्ली.


संपर्क:

हार्ट प्लस हॉस्पिटल, जळगाव

📞 9022880411 | 9168888556

डॉ. संदीप भरुडे – DNB, FSCAI (USA)

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

Post a Comment

0 Comments