दिशा लाईव्ह न्यूज:-: लोहारा येथील शिवभक्त परिवार व शिवमहापुराण समिती ग्रामस्थ मंडळी तर्फे आयोजित पवित्र शिवमहापुराण कथा सोहळ्याची सुरवात १४ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार पासून सुरू झाली आहे.
कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी ग्रामदैवत श्री तपेश्वर महादेव मंदिरात नारळ-निमंत्रण पत्रिका ठेवून विशेष निमंत्रण व पूजा करण्यात आली. यावेळी हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम चा जयघोष करण्यात आला. या भव्य दिव्य शिव महापुराण कथेचा शिवभक्त आणि ग्रामस्थांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा सहपरिवार लाभ घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
थोडक्यात मुख्य आकर्षणे:
दिनांक.१४ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता शिवशंभू व्याख्याते ह भ प मोहनजी शेलार महाराज आळंदी देवाची यांचे दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
दिनांक: १५ रोजी सकाळी ग्रंथ मिरवणूक असेल.
२२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शिवमहापुराण कथा असेल
कथा वाचन वेळ: रात्री ८ ते 11 पर्यंत
स्थळ: नवनाथ दरबार, सरकारी दवाखाना समोर पाचोरा रोड लोहारा
या कथेसाठी सुप्रसिद्ध कथावाचक मधुरभाव रसमूर्ती प पू हरिदासजी महाराज (वृंदावन धाम)यांचे अमृतवाणीत निरूपण होईल.
शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीने होणार आहे.
२२ फेब्रुवारी रोजी 9 वाजेपासून सकाळी गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून संध्याकाळी लोहारा व परिसरातील नागरिकांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
रात्री ठीक आठ वाजता
हभप राजेंद्रजी महाराज (केकतनिभोरा)यांचे काल्याच्या कीर्तनाने या भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवाची सांगता होईल.
ही कथा भगवान शिवाच्या कृपेने जीवनाला दिशा देणारा अनुभव ठरेल, असा विश्वास शिवभक्त परिवार , ग्रामस्थ मंडळी आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी निलेश जोशी, भूषण शिवदे, गजानन क्षीरसागर, सुरेश माळी, गोकुळ माळी, योगेश कोळी, दत्तू माळी,बापू पाटील, रविंद्र क्षीरसागर,गजानन राजपूत, निलेश देशमुख, ईश्वर शिंदे,आदी स्वयंसेवक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments