Type Here to Get Search Results !

टीम इंडियाचा 'शानदार विजय! पाकिस्तानचा धुव्वा उडवत मारली सुपर ८ मध्ये एन्ट्री!! ईशान किशनची धुवांधार फलंदाजी. या सामन्यातील विजयासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय संघाने सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले.



दिशा लाईव्ह न्यूज --::--आज दिवसरात्र कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला.भारतीय गोलंदाजांनी  अप्रतिम गोलंदाजी करत  पाकच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

 पहिल्यांदा फलंदाजी करताना  भारताचा स्टार फलंदाज ईशान किशनच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात  १७५ धावा करत पाकिस्तानच्या संघासमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. 


या धावसंख्येचा बचाव करताना भारतीय संघातील गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून पाकिस्तानला धक्क्यावर धक्के दिले. पहिल्या दोन षटकात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं मिळून पाकिस्तानच्या आघाडीच्या तिघांनी स्वस्तात माघारी धाडले.



 त्यानंतर भारताच्या फिरकीतील जादू दिसली अन् पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटले. 

या सामन्यातील विजयासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय संघाने सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. एवढेच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड ८-१ असा भक्कम केला.

Post a Comment

0 Comments