दत्तात्रय काटोले, सोयगाव
दिशा लाईव्ह न्यूज --::- दि.१६ : सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोयगाव नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तीन प्रभागांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, सोयगाव नगरपंचायत प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. नगरपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकासकामांना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी, एलईडी दिव्यांद्वारे वीज बचत, जलसंधारण उपक्रम आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकरराव (आबा) काळे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, देविदास पालोदकर, नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, कदीर शहा, गजानन कुडके, राजू दुतोंडे, हर्षल काळे, दीपक पगारे, भगवान जोहरे, लतिफ शहा, किशोर मापारी, अशोक खेडकर, शेख रौफ, विष्णू इंगळे, सोपान पाटील, शिव आप्पा चोपडे, फिरोज पठाण, बाळू पाटील, समाधान तायडे, दिलीप देसाई, समाधान काळे, अविनाश पाटील, कुणाल राजपूत, जगू मिसाळ आदी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments