काशिनाथ आल्हाट --::--जुन्नर तालुका प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज --::--आळंदी देवाची ता खेड नगरपारिषद नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैजंताताई उमरगेकर या बहुमताने निवडून आल्या. त्यांचा सत्कार पुणे जिल्हा मातंग समाज बांधवांच्यावतीने आळंदी येथे नुकताच करण्यात आला.
सौ. वैजंताताई उमरगेकर यांनी सामाजिक सेवेचा वसा घेतलेला आहे. त्यांनी नगरसेवक तसेच नगराध्यक्षा म्हणून काही वर्ष आळंदीच्या नगरपारिषदेचे कामकाज उत्तम रित्याने पार पाडले आहे. प्रशासनातील बारकावे त्यांना माहित आहेत. त्यांच्याकडून अनेक भौतिक विकासाचे व परिसर सुधारण्याचे निर्णय धाडसाने झाले. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने त्यांना या निवडणुकीत बहुमताचा कौल दिला. आणि प्रचंड बहुमताने विजय केले.
नवनिर्वाचित नगरसेवका वैजयंतीताई उमरगेकर या माजी नगराध्यक्ष अशोकराव उमरगेकरांच्या धर्मपत्नी आहेत. माजी नगराध्यक्ष अशोकराव उमरगेकरांचे संपूर्ण आयुष्य जनसेवेत गेले आहे .वंचित उपेक्षिंतासाठी ते आधारवड ठरलेले आहेत. आळंदीच्या विकास कामात ते सतत अग्रभागी राहिले. सन २००७ ते २०१४ या कालखंडात अशोकराव उमरगेकर हे आळंदीचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आळंदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा विकास केला.
सौ वैजंताताई नगरसेविका या सार्वजनिक मागासवर्गीय कल्याणकारी व आरोग्य विभागाच्या विद्यमान सभापती आहेत .
या सत्काराच्या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार्थी प्रा. काशिनाथ आल्हाट,सेवानिवृत्त वनाधिकारी वसंतराव लोंढे, दलित सेवक संघाचे ज्येष्ठ नेते सोपानराव चव्हाण, वधुवर सुचक मंडळाचे प्रवक्ते संदीप आल्हाट, ज्येष्ठ समाज बांधव माऊली पाटोळे, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, ज्ञानदेव पवार, सामाजिक नेते अविनाश लोणारे , पीएमटीचे वाहक संतोष पंचरास,कांबळे कुशिंदा , सुभाष सुपेकर ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments