सोयगाव :दत्तात्रय काटोले.
दिशा लाईव्ह न्यूज --::---सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन गटांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर झाला.
निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश शिनगारे व सहाय्यक अधिकारी मनीषा मेने (जोगदंड) यांनी निकाल घोषित केला. या निकालात भारतीय जनता पार्टीने दोन जिल्हा परिषद गट व तीन पंचायत समिती गणांवर वर्चस्व प्रस्थापित करत तालुक्यात आपली ताकद वाढवली आहे. तर गोंदेगाव जिल्हा परिषद गटावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आपली परंपरागत पकड कायम राखली आहे.
तालुक्यातील फर्दापूर व आमखेडा जिल्हा परिषद गटात भाजपने दणदणीत विजय मिळवला, तर गोंदेगाव गटात शिवसेना (उबाठा) यशस्वी ठरली. पंचायत समितीच्या गणांमध्ये फर्दापूर, सावळदबारा व आमखेडा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर निंबायती व गोंदेगाव गणात शिवसेनेने, आणि बनोटी गणात शिवसेना (उबाठा) गटाने बाजी मारली.
मागील निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली फर्दापूर व गोंदेगाव गटांसह पंचायत समितीवर सत्ता होती. मात्र यावेळी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने फर्दापूर व आमखेडा या दोन जिल्हा परिषद गटांबरोबरच फर्दापूर व सावळदबारा या पंचायत समिती गणांतील अतिरिक्त जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व अधिक भक्कम केले आहे.
जिल्हा परिषद निकाल.....
फर्दापूर गट : भाजपचे माहीन इद्रिस मुलतानी (१३,८३७) यांनी शिवसेनेच्या प्रभावती चव्हाण दारासिंग (९,९९६) यांचा ४,७३१ मतांनी पराभव केला.
आमखेडा गट : भाजपच्या पुष्पा प्रकाश काळे (१०,८७१) यांनी शिवसेनेच्या मोनाली पवार (७,६०६) यांच्यावर ३,२६५ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
गोंदेगाव गट : शिवसेना (उबाठा) चव्हाण सुनीता चंद्रशेखर (६,८२६) यांनी शिवसेनेच्या पूजा वाघ (६,१८१) यांचा ६४५ मतांनी पराभव केला.
पंचायत समिती निकाल
फर्दापूर गण : भाजपचे राहुल अंकुश राठोड (६,३९३) विजयी – २,२६५ मतांची आघाडी
सावळदबारा गण : भाजपचे उत्तम महारू चव्हाण (६,५७३) विजयी – २,२४२ मतांची आघाडी
आमखेडा गण : भाजपच्या जयश्री गजानन पवार (५,२६९) विजयी – १,९०६ मतांची आघाडी
निंबायती गण : शिवसेनेच्या सविता सोपान गव्हांडे (५,११०) विजयी – १,४८८ मतांची आघाडी
गोंदेगाव गण : शिवसेनेच्या गयाबाई गोविंदा घोडे (३,७९८) विजयी – ९६० मतांची आघाडी
बनोटी गण : शिवसेना (उबाठा) वैभव सागर पाटील (३,०३८) विजयी – ४४१ मतांची आघाडी
फोटो ओळ :
सोयगाव – जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपच्या आमखेडा व फर्दापूर गटातील उमेदवार पुष्पा काळे व माहीन मुलतानी यांच्या विजयी मिरवणुकीचा क्षण.



Post a Comment
0 Comments