Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथील वाकडी जलाशयाच्या पाण्याची पातळी खालावली*. यामुळे भविष्यात दोन्ही गावांना बसू शकतात पाणी टंचाईचे चटके!! ग्रामस्थांना आतापासूनच लागली पाण्याची चिंता. पाटबंधारे अधिकारी लक्ष देतील काय?



कुऱ्हाड प्रतिनिधी --सुनील लोहार.

दिशा लाईव्ह न्यूज --::--कुऱ्हाड खुर्द व बुद्रुक गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाकडी जलाशयाची पातळी दिवसेन दिवस कमी होत  असल्याने  भविष्यात दोन्ही गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

यावर्षीच्या समाधानकारक पावसाळ्यामुळे या परिसरातील धरणे तुडुंब भरली होती. यात  वाकडी धरण हे शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी वाकडी जलाशयातून शेतकऱ्यांनी शेतीसाठी वीज पंपाद्वारे पाणी उचलले तसेच सद्या कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले असल्याने  या धरणाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जात असल्याने भविष्यात कुऱ्हाड खुर्द व बुद्रुक गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.



ग्रामपंचायती ने दिलेल्या पत्राला पाटबंधारे विभागाची केराची टोपली.


सदर कुऱ्हाड ग्रामपंचायतीने धरणातील पाणी उपसा संदर्भात पाचोरा येथील पाटबंधारे विभागाला दोन वेळा लेखी पत्र दिले असून ,अजून पर्यंत कोणतीही दखल घेतली नसून भविष्यात गावाला व  गुराढोरांना  पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल हे निश्चित.

म्हणून पाटबंधारे विभागाने अजून उन्हाळ्याचे चार महिने लक्षात घेऊन तातडीने या गंभीर परिस्थिती कडे लक्ष देऊन पाण्याची समस्या मिटवावी अशी मागणी कुऱ्हाड ग्रामस्थांनी केली आहे.



  वाकडी धरणाच्या पाण्याच्या वरील समस्या संदर्भात पाटबंधारे उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली ,याचा अर्थ असा की  या धरणावर पाटबंधारे विभागाचे  दुर्लक्ष होत असून ,कोणीही धरणातील   पाण्याची नासाडी करावी आणि या मुळे  लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात गंभीर पाणी टंचाई ला सामोरे जावेच लागेल ही काळ्या दगडावरील रेष होय. 

भविष्यात या गावांना पाणीटंचाई जाणवल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहे.

Post a Comment

0 Comments