Type Here to Get Search Results !

शेरी ,ता.जामनेर येथे शिवलिंगाची केली प्राणप्रतिष्ठा!! भव्य शोभायात्रेने वेधले ग्रामस्थांचे लक्ष.



दिशा लाईव्ह न्यूज---::::----पहूर (ता. जामनेर) – जामनेर तालुक्यातील शेरी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य शिवमंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. आज काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले.


शेरी गावात लोकवर्गणीतून शिवमंदिर उभारणीचा संकल्प पूर्णत्वास आला असून या मंदिराची पायाभरणी पहूर श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली होती.




आज शनिवारी शिवलिंगाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज आकर्षक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री हरिभक्त परायण उखाजी महाराज हिवरेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.


संपर्क दिनेश चौधरी, लोहारा.

द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य.

जळगांव जिल्हाध्यक्ष. 9309918930


Post a Comment

0 Comments