पुणे प्रतिनिधी/ शकील मनियार
दिशा लाईव्ह न्यूज---:::----शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश सासवडे यांचा वाढदिवस यंदा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थ, माता-भगिनी तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला.
चाकण चौक, शिक्रापूर येथील हृदय हॉस्पिटल, छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ९१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली. “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी देणं महत्त्वाचं” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या शिबिराचे आयोजन भूमाता ब्रिगेड, भूमाता फाउंडेशन, यशकीर्ती सामाजिक संस्था (शिक्रापूर), द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,समस्या उपाय ग्रुप, शिक्रापूर सत्यमेव जयते ग्रुप तसेच अखिल मराठा महासंघ (शिरूर तालुका) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सर्व संघटनांनी अत्यंत देखण्या नियोजनातून कार्यक्रम यशस्वी केला.
या शिबिरात रक्तदात्यांची मोफत तपासणी करण्यात आली प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तसेच पोलीस मित्रांना काठयाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास पी आय दीपरत्न गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या मोनिकाताई हरगुडे, पंचायत समिती सदस्य रामभाऊ सासवडे,माजी पंचायत समिती सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश गडदे, दत्ताभाऊ हरगुडे, संगीता ताई विकारी, उद्योजक रवी भुजबळ,सिमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा सिमाताई पवार , शिवाजी दरेकर, अलकाताई जोगदंड, नंदा भुजबळ, राणी जगताप, स्वप्निल कळमकर राहुल नरके, रंजीत लांडे शिवव्याख्याते शरद दरेकर, गणेश सातपुते, पत्रकार विश्वनाथ घोडके, भाऊसाहेब कोकडे, अभिमान खेडकर, लालचंद थोरात, गणेश दहिफळे, प्रीतीताई दोन्हे, जितेंद्र वाढवे अतुल थोरवे, बाप्पू न्हरे,आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी सतीश सासवडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, समाजहिताचा हा आदर्श उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आलेल्या सर्व मान्यवरांचे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिला सचिव डॉ मंगलताई सासवडे यांनी आभार मानले.






Post a Comment
0 Comments