दिशा लाईव्ह न्यूज---::-- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करिअर कट्टा”च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात अ. र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सह-विभागीय समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत होते. उद्घाटक म्हणून मा. रवींद्र साठे सभापती (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई) उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. नामदेव भोसले सहसचिव मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन),
मा. श्री. प्रफुल्ल पाठक (अध्यक्ष, सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया),
माननीय श्री यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा. डॉ. चौधरी यांनी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, उद्योजकता प्रबोधन व विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या यशस्वी समन्वयाबद्दल राज्यस्तरावर विशेष कार्य केल्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच दिल्ली येथे पार पडलेल्या शैक्षणिक दौऱ्यातील उत्कृष्ट नियोजन व यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना विशेष सन्मान पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांना एकाच कार्यक्रमात दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सह सचिव दादासाहेब यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड तसेच सर्व संचालक मंडळ तसेच आप्पासाहेब. र. भा.गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य, , प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांच्या कार्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून भविष्यातही त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Post a Comment
0 Comments