Type Here to Get Search Results !

पाळधी,ता.जामनेर येथील तरुण चेन्नई येथील समुद्रात बेपत्ता १७ दिवसांपूर्वीच झाली होती इंटर्नशिपसाठी निवड. कुटुंब शोकसागरात.




दिशा लाईव्ह न्यूज-- : ---चेन्नई येथे समुद्रात वाहून गेलेल्या तीन जणांमध्ये पाळधी, ता. जामनेर येथील तरुण जय नरेंद्र पाटील (२१) याचा समावेश आहे. त्याचा काल सकाळी  मृत्यदेह हाती लागला असून , त्याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून अंबुलन्स गाडीने पाळधी गावाकडे रवाना झाली आहे. आज संध्याकाळ पर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवळपास संध्याकाळी 4 ते5 वाजेपर्यंत ऍम्ब्युलन्स गाडी येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

   जय हा चेन्नईतील कॉग्नीझंट कंपनीत इंटर्नशिपसाठी तो ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रुजू झाला होता.

शनिवारी सुटी असल्याने कंपनीतील काही तरुण समुद्रकिनारी फिरायला गेले होते. 

त्यावेळी समुद्रात अचानक लाटा उसळून त्यात  जय सह तीन जण पाण्यात ओढले गेले. त्यात जय पाटील याचाही समावेश होता. त्याचा रविवारी दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नव्हता. त्यामुळे परिवाराची चिंता वाढली होती.

जय हा अभियांत्रिकी पदवीधर असून पाळधी, ता. जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. 

शनिवारी सकाळी त्याने पाळधी येथे घरी फोन करून सुटी असल्याने मित्रांसोबत फिरायला जात असल्याचे  कुटुंबीयांना कळविले होते, मात्र काही वेळानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्याचे काही नातेवाईक चेन्नईत पोहोचले आहेत.

जयच्या बहिणीचे बारावीचे पेपर सुरू आहेत. त्यामुळे परिवारातील लोक अधिकच काळजीत आहेत. त्याचे वडील शेतकरी, तर आई शिक्षिका आहे.

 दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती.मुख्यमंत्री यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधत मदत व बचावकार्याची माहिती घेतली होती.

आज संध्याकाळ पर्यंत त्याचा मृतदेह मूळ गावी (पाळधी ) येथे आणण्यात येणार असून आजच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments