Type Here to Get Search Results !

बापूसाहेब पवार शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी!


दिशा लाईव्ह न्यूज ---:::---भवानी पेठेतील बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ३९६ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेतील सर्व परिसर शिवमय झाला होता, रांगोळ्या पताका शिवरायांचा पुतळा यांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थी शिवरायांचे मावळे,जिजाबाईंच्या वेशात तसेच भवानी माता,अफजलखान यांचाही वेश काही विद्यार्थ्यांनी पारीधाण केला होता.विदयार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल गवळी,पत्नी हेमा गवळी व त्यांची कन्या काव्या यांचे स्वागत केले.बालसभा घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करुन त्यांचेही स्वागत करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे द युवा ग्रामीण पत्रकार संघ चे पुणे शहर अध्यक्ष अनिल गवळी , हेमा गवळी ,ऋतुजा तापकीर यांच्याहस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगणारे मनोगत व भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले.बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पाळणा भाषणे, नृत्य, स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा शिवगर्जना सादर केली.




छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती भाषणे, पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा तसेच ढोल लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक व प्रभात फेरी काढून बाल शिवाजी यांचे भवानी माता मंदिरात जाऊन भवानी मातेचे दर्शन घेण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ४ थी च्या विद्यार्थीनी विशाखा डाडर हिने केले .प्रास्ताविक इकरा शेख व आभार ओमकार खंडागळे या बालचमूंनी केले. कार्यक्रमाची सांगता शिवरायांच्या आरतीने झाली व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्यध्यापिका हेमलता कुऱ्हाडे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका रोझमेरी पारगे व कामिनी शेंगाळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments