Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम! वह्या-पेन वाटप करून शिवजयंती उत्साहात साजरी!!


दिशा लाईव्ह न्यूज----::---  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. 

पाटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे वंचित व गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटप करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

            द - युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अन्सार भाई शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास हा ध्यास ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. आशिफ भाई गडकरी व द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आशिफ भाई गडकरी (सामाजिक कार्यकर्ते) व पुनर्वसन अधिकारी परेश तपासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

 त्यानंतर दीपप्रज्वलन महिला राज्य अध्यक्षा रुपाली ताई सावंत, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन खरात, विद्वत्ता न्यूज पेपरचे मुख्य संपादक विकासजी कदम, तसेच पाटण तालुका अध्यक्ष पांडुरंग लोहार यांच्या हस्ते करण्यात आले.



                “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी पांडुरंग लोहार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “केवळ वेषभूषा करून शिवाजी महाराज होता येत नाही; त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठा या गुणांचे आचरण आपल्या जीवनात केले पाहिजे.”

              बार्टीचे समतादूत सागर जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्य ही स्वराज्याची संकल्पना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समाविष्ट केली.”

                बाळासाहेब देसाई कॉलेजचा विद्यार्थी तुकाराम शिंदे यांनी आजच्या समाजातील जातीय विभाजनाबाबत परखड मत व्यक्त करत सामाजिक ऐक्याची गरज अधोरेखित केली.

 कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशिफ भाई गडकरी व परेश तपासे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रुपाली ताई सावंत व नितीन खरात होते. यावेळी चंद्रकांत सुतार, शुभम उबाळे, विक्रम महिपाल, सचिन भिसे, अविनाश भिसे, अच्युत लोहार, महेश सूर्यवंशी, राजेश कांबळे, संदीप कोळी, मोहिते परमार, रामचंद्र ढमाळ, संतोष लाड, दिगंबर खैरमोडे, सचिन यादव आदी मान्यवर व वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा विद्यार्थी तुकाराम शिंदे यांनी केले.



Post a Comment

0 Comments