दिशा लाईव्ह न्यूज --::-- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुजरात मधील बडोदरा ,पादरा येथे मराठमोळ्या शिवकन्यांनी लेझीम नृत्य सादर करत उपस्थित त्यांची मने जिंकली मराठमोळ्या या संस्कृतीला सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर कौतुकाचा वर्षावही मोठ्या प्रमाणावर करण्यात आला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार आरती व शिवगर्जना करत कार्यक्रमास सुरुवात खाण्यात आली ,अंबामाता मंदीर ते गायत्री मंदरापर्यत भव रैलीचे आयोजन करण्यात आले होते
कल्पना पवार व जयश्री जाधव यांच्या ग्रुपने शिवगीत त्याचबरोबर विठ्ठल गीतांचे सादर केलेले लेझीम नृत्य आकर्षणाचा क्रेंन्दबिन्दु बनले होते यावेळी बोलताना कल्पना पवार म्हणाल्या मराठी संस्कृती ही नेहमीच सातासमुद्रापार आपला ठसा उमठवत राहिली आहे , छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या कार्याची ख्याती सात समुद्रापार उमठवली आहे ,आज शिवबा राज्यांच्या व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे आज प्रत्येक मराठी माणसाचा कना ताठ आहे
तर जयश्री जाधव यांनी महारांजे विचार सर्वांनी आत्मसात करुन आपल्या मुलांना खरे शिवविचार द्यावे व महाराजांचे बलीदान नेहमी आठवावे असे मत व्यक्त केले
सदर कार्यक्रमात लाठ्यांचा खेळ, लेझीम तसेच विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

Post a Comment
0 Comments