कुऱ्हाड प्रतिनिधी.:-सुनील लोहार
दिशा लाईव्ह न्यूज---:::----लोहारा येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दिनांक 18 तारखेला सुरू झालेल्या जयंती उत्साहात संपन्न झाली.
प्रथम दिवशी हिंदू शेरणी हर्षु ताई ठाकूर यांचे व्याख्यान रात्री संपन्न झाले.दिनांक 19 तारखेला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते छञपती शिवरायांची आरती करून , शिवजन्मोत्सव निमित्त सायंकाळी गावातून सजीव देखाव्यात, अष्टप्रधान मंडळासह डीजेच्या तालावर भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
तसेच 20 तारखेला रात्री दहा ते अकरा यादरम्यान झी प्रवाह फेम शाहीर आविष्कार देशिंगे साताराकर यांच्या पथकाचा शिवरायांच्या जन्मावर पोवड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामस्थांच्या मदतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिव जयंती उत्सव समितीने केले होते.
सलग तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास अध्यक्ष सुजित शिंदे, विलास चव्हाण,सचिन माळी,रवी चव्हाण,ऋषिकेश चौधरी ,गणेश शिंदे,पप्पू गायकवाड,अविनाश शिंदे,संदीप शिंदे,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तर लोहारा पोलीस दूरक्षेत्र चे तात्याराव नागरे, शांतीलाल पगारे व योगेश भिलखेडे, यांच्यासह होमगार्ड बांधवानी या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमावर चोख बंदोबस्त ठेवला.




Post a Comment
0 Comments