Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विद्यानंद देठे यांचे यश

पहूर प्रतिनिधी.

दिशा लाईव्ह न्यूज  --::----- जामनेर तालुक्यातील निमखेडीपिंप्री येथील रहिवासी विद्यानंद रामलाल देठे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (श्रेणी- १) पदी निवड झाली आहे. 

राज्यातून द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. तो निवृत्त सैनिक रामलाल कडू देठे यांचा चिरंजीव आहे. याच कुटुंबातील त्यांचे चुलत बंधू व न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूरचे माजी विद्यार्थी सागर देठे यांचीही २ वर्षांपूर्वी भारतीय लोकसेवा आयोगामार्फत जिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. निमखेडीसारख्या छोट्या गावातून एकाच कुटुंबातील दोघांनी भारतीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विद्यानंद रामलाल देठे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments