दिशा लाईव्ह न्यूज--::-- धी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शेंदुर्णी संचलित श्रीमती पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालय, वरखेडी (भोकरी) येथे गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजयरावजी गरुड होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री. सागरमलजी जैन, सहसचिव श्री. यु. यु. पाटीलसर, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष API कल्याणी वर्मा मॅडम उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमास वरखेडी गावाचे सरपंच पती चंद्रकांत पाटील (सोनवणे), भोकरी सरपंच अफसर काकर, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संजय जैन, माजी सरपंच धनराज विसपुते धनराज पाटील, माजी उपसरपंच डॉ. धनराज पाटील, असलम काकर, पोलीस पाटील, बाळू कुमावत, रामकृष्ण पुनवते, जावेद काकर, पत्रकार हेमशंकर तिवारी, पत्रकार रविशंकर पांडे तसेच या मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीतने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पणाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी. एन. पाटील मॅडम यांनी केले. जिवनात पुढे जायचे असेल तर सकारात्मक विचार, अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी,अडथळ्यावर मात या पंचपदीचा वापर जर आपण केला तर नक्कीच यशस्वी व्हाल जसे की प्रयत्नांती परमेश्वर असे त्यांनी सांगितले .विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी गांधी विचार संस्कार परीक्षेत इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. गौरी शिवचरण परदेशी हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. API कल्याणी वर्मा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत जीवनात शिस्त, परिश्रम व ध्येय निश्चितीचे महत्त्व पटवून दिले. व आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी श्रम, नियम ,आणि संयम याचा वापर करा. श्रमाशिवाय यश मिळणार नाही, वेळेचे नियोजन करा! नियमाचे पालन करा, संयमशील बना परीक्षेत यश मिळणारच !!आत्मविश्वास अंगी बाळगावा व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव सागरमल जैन व धनराज आण्णा विसपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी मनोगतात जयदीप दुधे, तर विद्यार्थिनी मनोगतात कु. मानसी परदेशी व कु. यास्मिन शाह यांनी आपले विचार मांडले. शिक्षक मनोगतामधून इयत्ता 10वी चे वर्गशिक्षक ए. ए. खान सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात संजयराव गरुड यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन . ए. एस. चव्हाण सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन . एम. एन. कोळी सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.








Post a Comment
0 Comments