काशिनाथ आल्हाट --::--जुन्नर तालुका प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज--::---चैत्र महिना सुरू झाला .की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जत्रांचा आणि तमाशांचा हंगाम सुरू होतो.
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीत दरवर्षी 35 ते 40 तमाशा फड आपली कार्यालये स्थापन करतात.
यावर्षी नव्या दमाचा, रसिकांच्या पसंतीचा नंबर वन वन्स मोर घेणारा अश्विनी पुणेकर सोबत बाळासाहेब बेल्हेकर तमाशा फड या तमाशा पंढरीत दाखल झाला आहे.
या तमाशा फडाचे मालक बाळासाहेब बेल्हेकर हे महाराष्ट्राच्या तमाशा कलेतील एक उत्तम दर्जाचे गायक, उत्तम सरदार आणि कलेचे जाणते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
यापूर्वी त्यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ , हरिभाऊ बडे नगरकर,चंद्रकांत ढवळपुरीकर, ,मालती इनामदार,जगन कुमार वेळवंडकर अशा नामांकित तमाशा फडांमध्ये अनेक वर्ष उत्तम गायकीचे आणि सरदारकीचे काम केलेले आहे.
बाळासाहेब बेल्हेकर याची तमाशाची सुरुवात शंकर माने चिंचणीकर यांच्या तमाशा फडातून झाली कृष्णाच्या गवळणी गाणारा एक कलावंत म्हणून रसिकांच्या नावलौकिकत आहे.
तमाशा पंढरी नारायणगावात महाराष्ट्रातील गावकरी मंडळी या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी येतात . यावर्षी त्यांनी नारायणगाव येथे राहुटी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत अश्विनी पुणेकर या उत्तम नर्तिका आहेत . त्यांनी सुद्धा अनेक तमाशातून तमाशा फडातून काम केले आहे.
आजच्या तरुणांना जी आवडती गाणी आहेत. ती सादर करुन धुमाकूळ करणार म्हणून रसिकांची पसंती वन्स मोर असा तमाशा फड नारायणगावच्या तमाशा पंढरीत राहुटी दाखल झाला आहे.
पारंपरिक गणगौळण आणि गाण्यांचा धुमाकूळ घालणारा तमाशा क्षेत्रातील एकमेव तमाशा म्हणजेच अश्विनी पुणेकर आणि सोबत बाळासाहेब बेल्हेकर असा तमाशा फड आपल्या पसंतीला उतरेल .
या तमाशाचे व्यवस्थापन तमाशा क्षेत्रातील अनुभवी तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट व बी एम वर्धेकर पहात आहेत .तर आंतरराष्ट्रीय संगीततज्ञ गायक संजू फल्ले आणि स्वप्नीलशेठ मुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments